पुरस्कार
१०० कोटी ते २०० कोटींच्या वाढीला ग्रोथ म्हणतात .जेव्हा नितीमत्ता ,प्रामाणिकपणा ,शिस्त वाढीस जोडली जाते तेव्हा त्याला प्रगती म्हणतात.जेव्हा प्रगतीमध्ये मानवता ,नैतिकता आणि अध्यात्म जोडले जाते तेव्हा ते यश असते .म्हणूनच ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन्स तर्फे रिअल अचिव्हर्श पुरस्कार .
Radio City अहमदनगर तर्फे रेडीओ सिटी आयकॉन पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने संस्थेला Ahmednagar Icon Awards-२०२३ ने Women Empowerment Through Bachat Gat या पुरस्कारासाठी गौरविण्यात आले.सदर पुरस्कार पद्मश्री पोपटराव पवार व नगरचे आयकॉन नरेंद्रजी फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
अहमदनगर मधील पहिली खाजगी बाजार समिती म्हणजेच चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीला सकाळ समूहाचा अग्रोवन बिझनेस एक्सलंसअवार्ड-२०२३ पुणे येथे सकाळ समूहाचे श्री प्रतापराव पवार व प्राज इंडस्ट्रीचे चेअरमन प्रमोद चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी अग्रोवन चे संपादक आदिनाथ चव्हाण यांची उपस्थिती व चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन […]
National Human Rights Organization तर्फे दिला जाणारा Indian Icon Award-2021 दिल्ली येथे NHRO चे चेअरमन डॉ.जितेंद्र रवी, श्री मामा नतुंग,श्री युवाचार्य अभ्याद्सजी महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन श्री विठ्ठलराव वाडगे साहेब यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला.
पुणे येथे राष्ट्रीय सहकारी विकास निगम ,दिल्लीतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट सहकार पुरस्कार 2021 संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे ,राज्य सहकारी विकास महामंडळाचे लेफ्टनंट कर्नल विनीत नारायण ,डॉ.अभय देशपांडे ,नाबार्डचे जी.एस.रावत यांच्या हस्ते स्वीकारला.
अग्रोकेअर कृषिमंच नाशिक आयोजित कृषी शिक्षण,विस्तार,संशोधन क्षेत्रातील कृषिभूषण महाराष्ट्र एफ. पी. ओ फेडरेशन यांच्याकडून चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन श्री वाडगे साहेब यांना कृषी प्रेरणा पुरस्कार-२०२१ यासाठी सन्मानित.