अध्यक्ष बद्दल
चेअरमन यांचे मनोगत
वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.
सोसायटी लि.
“ राम कृष्ण हरी “
जगद्गुरू संत तुकाराम,कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउलींच्या कृपाशीर्वादाने व परमपूज्य स्वामी नारायणानंद सरस्वती यांच्या छत्रछायेखाली सन -2012 रोजी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेटचे छोटेसे रोपटे लावण्यात आले. माउलींच्या आशीर्वादाने व आपणा सर्वांच्या दृढ विश्वासामुळे या छोट्याश्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
समाजातील वंचित व तळागाळातील जनतेची स्वप्ने,आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अखंड कार्यरत राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.
समाजातील सर्वस्तरातील जनतेला अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावणे,त्यांचे भविष्य सुरक्षित करणे,महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणे व देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हातभार लावणे हा आमचा प्रामाणिक दृष्टीकोन आहे.
आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे आज वृद्धेश्वर परिवार यशाची शिखरे चढत आहे.आज संस्थेने 200 कोटी ठेवींचा टप्पा पार केला आहे,तो केवळ आपल्या संस्थेवरील प्रेमामुळे.
याबद्दल आपले मनापासून धन्यवाद .
आम्ही आपल्या सर्वोत्तम सेवेसाठी सदैव तत्पर आहोत.
आपला सेवक :- श्री विठ्ठलराव भाऊसाहेब वाडगे.