OUR WORK

11.11.2020 – दिपावली निमित्त गोर-गरिबांना आपली दिवाळी साजरी करता यावी यासाठी महिला बचत गटांना प्रथमच मोफत साखर वाटप करण्यात आली.तसेच महिला बचत गटांना कर्ज वाटपही करण्यात आले.यावेळी बाबासाहेब भोस,आघाव भाऊसाहेब ,पोलीस उपनिरीक्षक दौलतराव जाधव,शरद गावडे ,शंकर गवते तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते.

08.03.2021 – महिला दिनानिमित्त महिला उद्योजिका ,रणरागिणी यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमास परिविक्षाधीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे,नागपूर येथील अधिकारी डॉ.राणी पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून तर श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षा सौ शुभांगी पोटे अध्यक्षस्थानी होत्या.

30.10.2021 – दिवाळी निमित्ताने मागील वर्षी प्रमाणे महिला बचत गटांना धनादेश वाटप व बचत गटातील महिलांना साखर वाटप करण्यात आले.यावेळी शहाजी हिरवे,ईश्वर जंजिरे,आघाव भाऊसाहेब,तहसीलदार कुलथे साहेब उपस्थित होते.त्यांच्या हस्ते बचत गटांना 1 कोटी रुयांचे कर्ज वाटप करण्यात आले.तसेच कोरोन काळात द्राक्ष्याचे दर कोसळल्याने अडचणीत आलेल्या द्राक्ष बागायत दारांना ऑक्टोबर छाटणीसाठी 3 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

19.02.2022 – संस्थेमार्फत विविध महापुरुष्यांच्या जयंती ,पुण्यतिथी साजरी करण्यात येतात.आमदार मा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजयंती संस्थेमार्फत साजरी करण्यात आली.यावेळी बाळासाहेब महाडिक व इतरहि मान्यवर उपस्थी होते.

30.10.2021 – दिवाळी निमित्ताने मागील वर्षी प्रमाणे महिला बचत गटांना धनादेश वाटप व बचत गटातील महिलांना साखर वाटप करण्यात आले.यावेळी शहाजी हिरवे,ईश्वर जंजिरे,आघाव भाऊसाहेब,तहसीलदार कुलथे साहेब उपस्थित होते.त्यांच्या हस्ते बचत गटांना 1 कोटी रुयांचे कर्ज वाटप करण्यात आले.तसेच कोरोन काळात द्राक्ष्याचे दर कोसळल्याने अडचणीत आलेल्या द्राक्ष बागायत दारांना ऑक्टोबर छाटणीसाठी 3 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.

10.05.2022 – श्रीगोंद्यातील पारगाव फाटा येथे रामायणाचार्य ह.भ.प.ढोक महाराज यांचे तुलसीरामायण कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाद्वारे श्रीगोंदा व परिसरातील धार्मिक वारकरी भक्तांसाठी अध्यात्मिक श्रवणीय कार्यक्रमाचा लाभ मिळवून दिला .उद्घाटनावेळी आमदार बबनराव पाचपुते,प्रतिभा पाचपुते,अनुराधाताई नागवडे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.तसेच इतर धार्मिक मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

20.10.2022 – दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बचत गटांना कर्ज वाटप व फराळ वाटप करण्यात आले.यावर्षी 64  महिला बचत गटांना 2 कोटी 13 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले तर 500 गटांना फराळ वाटप करण्यात आले.यावेळी वीरपत्नी सोनाली शिंदे यांचा साडीचोळी देऊन सत्कार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख ,जिल्हा न्यायाधीश एन.जी.शुक्ल ,प्राचार्य ज्ञानदेव म्हस्के ,पोलीस उपनिरीक्षक अमित माळी यांच्या हस्ते करण्यात आला.गटविकास अधिकारी राम जगताप ,वकील संघाचे दत्तात्रय झराड व इतर मान्यवर उपस्थित होते.

08.03.2023 – दरवर्षीप्रमाणे महिला दिनानिमित्त तालुक्यातील महिला कीर्तनकार व गायिकांचा सत्कार यावर्षी आयोजित करण्यात आला.यावेळी कीर्तनकार सौ सुनंदा भोस ,विद्याताई रेपाळे यांच्याबरोबरच इतर महिला कीर्तनकार व गायिकांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.सौ रुख्मिणी वाडगे ,सायली वाडगे ,सुनील जंगले,ज्ञानेश्वर विखे व इतर मान्यवर उपस्थित होते.

महिलांचे आर्थिक सबलीकरण व्हावे हा हेतू मनात ठेवून संस्थापक श्री विठ्ठलराव वाडगे यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२० मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली.

श्रीमती नीलिमा मिश्रा,अध्यक्षस्थानी तनुजा लिपणे,प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक,सौ रजनीताई देशमुख मा.सभापती ,श्रीमती भक्ती काळे,सहाय्यक आयुक्त (राज्यकर) ,अ.नगर,श्री अनिल गावडे संचालक ,स्नेहालय अहमदनगर DR.किसन घोरसड पाटील ,एम.डी.उद्योगपती भारत प्रा.लि.हे सर्व पाहुणे उपस्थित होते.

14.02.2024- विधानपरिषद सभापती निवड झाल्याबद्दल राम शिंदे यांचा वृद्धेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी व महिला बचत गट मेळावा संपन्न झाला यावेळी संत नामदेव महाराजांचे 18 वे वंशज तुळशीदास महाराज नामदास व वृद्धेश्वर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक विठ्ठलराव वाडगे, आमदार विक्रम पाचपुते माजी मंत्री बबनराव पाचपुते पवन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे संत बाबा महाहंसजी महाराज, अॅड. प्रदीप खामगळ शहाजी हिरवे, चैतन्य महिला बचत गट अधिक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन रुक्मिणी वाडगे, शुभम वाडगे, अजय गावडे, सायली वाडगे, मेघना गावडे आधी उपस्थित होते.

02.04.2024- श्रीगोंदा तालुक्यातील गुणवंत अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात सोहळा संपन्न झाला यावेळी शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या उपजिल्हाधिकारी किरण वागस्कर, पोलीस उप अधीक्षक प्रशांत दरेकर, पोलीस अधीक्षक कोमल शिंगाळे, उपशिक्षणाधिकारी किरण शिंदे, सुरज वागसकर, प्रियंका शिंदे, रामदास गुंजाळ, दुय्यम निबंधक तुषार खेतमाळीस, तहसीलदार सागर वाघमारे नायब तहसीलदार शोभा लगड, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रीती घोरपडे, सहाय्यक मनपा आयुक्त किशोर जेठे, राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक विशाल शितोळे आदींचा दिनकर टेमकर, विजय कुलांगे विठ्ठलराव वाडगे आदींच्या हस्ते
सत्कार करण्यात आला.

12.06.2024- शेतीची कामे मुलांच्या शाळा प्रवेशासाठी प्रत्येकाला आर्थिक अडचण असते अशावेळी दरवर्षी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी वर्धापन दिनानिमित्त महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात येते यावर्षी देखील वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील 50 महिला बचत गटांना सुमारे 1 कोटी 27 लाख रुपयांचे कर्ज गट विकास अधिकारी राणी फराटे मुख्य अधिकारी पुष्पगंधा भगत प्रा. सर्जेराव हळजोर आदिंच्या असते वाटप करण्यात आले.

08.03.2025- जागतिक महिला दिन वृद्धेश्वर मल्टीस्टेट चा अभिनव उपक्रम
यावेळी महिलांना कर्जवाटप सौ. प्रतिभाताई आक्का पाचपुते यांच्या हस्ते तर सफाई कर्मचारी सन्मान डॉक्टर भाग्यश्री तापकिरे.
अॅड. दिपाली बोरुडे आणि सौ. सायली वाडगे यांच्या हस्ते साडी देऊन करण्यात आला. प्रास्ताविकात सौ सायली वाडगे यांनी महिला बचत गटात करण्यात आलेले कर्ज वाटप तसेच आगामी योजना आणि महिला समीक्षण महिला प्रश्न बाबत चर्चा केली.

08.03.2025 – वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड श्रीगोंदा व वृद्धेश्वर सेवा फाउंडेशन आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंती उत्सवानिमित्त व जागतिक महिलादिनानिमित्त महिला सन्मान सोहळा व गौरव पुरस्कार 2025 आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात प्रामुख्याने सौ प्रतिभा नितीन गुंडरे पाटील नगरसेविका, सौ सुनिता ताई आंधळे राष्ट्रीय कीर्तनकार, सौ. रुक्मिणी वाडगे चेअरमन चैतन्य महिला पतसंस्था, सौ. गंधाली चंद्रहास दाते संस्थापिका अध्यक्ष सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरूनगर उपस्थित होते.

06.06.2025-वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी श्रीगोंदा च्या 12 व्या वर्धापन आणि निमित्त महिला मेळावा विद्यार्थी करिअर मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाला संस्थांचे संस्थापक विठ्ठल वाडगे व बारामती येथील ज्ञानसागर गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सागर आटोळे, प्रसिद्ध व्याख्याता विजया वामनवृद्धेश्वर अर्बन च्या चेअरमन सौ. सायली वाडगे महिला बचत गटाच्या चेअरमन सौ. मेघना गावडे व इतर कर्मचारी वृंद सर्व उपस्थित होते.

12.10.2025वृद्धेश्वर अर्बन मध्ये फक्त आर्थिक गुंतवणूक नाही तर संस्कारांची गुंतवणूक*
संस्कार केले तर संस्कृती टिकेल, आणि संस्कृती टिकली तर देश टिकेल…
या सुंदर विचारातून ‘वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., यांच्या वतीने
‘चैतन्य अध्यात्मिक बालसंस्कार वर्ग’ हा एक दिवसीय मोफत बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. “
“या शिबिरामध्ये मुलांना संस्कारमूलक कथा, श्लोक, योग, ध्यान आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.
नैतिक मूल्ये, दैनंदिन दिनचर्या आणि मोबाईल- टीव्हीपासून दूर राहण्यासाठी मेडिटेशनचे महत्त्व सांगण्यात आले.”
“लहानग्या बालमित्रांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला…
हसरे चेहरे, ध्यानात गुंग झालेले क्षण, आणि संस्कारांची गोड शिकवण- • या सर्वांनी वातावरण पवित्र केलं.”
“या उपक्रमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, श्रद्धा आणि सद्गुणांची बीजे रुजली-
याच बीजांमधून संस्कारवंत भारताची पिढी घडेल, हीच आमची श्रद्धा!”

15.10.2025वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज, व्यवसाय, प्रशिक्षण आणि मुख्यतः उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हे महत्वाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे. तसेच संस्थेद्वारे महिला सबलीकरणाला आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वायत्त बनवायला हातभार लागला आहे.
दिवाळी निमित्त भेटवस्तू न देता पूरग्रस्त लोकांच्या जीवनातही दिवाळीचे चैतन्य भरावे या उदात्त हेतूने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विठ्ठलराव वाडगे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट, चैतन्य महिला बचत गटाची सहकारी पतसंस्था अहिल्यानगर, चैतन्य कृषि उत्पन्न बाजार समिती खाजगी यांच्या वतीने रक्कम रूपये पाच लाख रूपये वा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस महाराष्ट्र शासनाचे अधिकारी मा. श्री नारायण परझणे साहेब सहाय्यक निबंधक, श्रीगोंदा तसेच मा. श्रीमती क्रांती चौधरी मॅडम तालुका कृषि अधिकारी, श्रीगोंदा यांचे हस्ते सुपुर्द केला.

15.08.2025 – दिवाळी निमित्ताने मागील वर्षी प्रमाणे महिला बचत गटांना धनादेश वाटप व बचत गटातील महिलांना साखर वाटप करण्यात आले. वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट सोसायटी संस्थापक चेअरमन विठ्ठल वाडगे यांनी बोलताना बाजारातील मंदी काळात महिलांना बचत गटातील महिलांना आधार व्हावा म्हणून कर्जवाटप साखर वाटप करण्यात आले. यावेळी मा. श्री. नारायण परझणे साहेब (सहाय्यक निबंधक, श्रीगोंदा) आणि मा. श्रीमती क्रांती चौधरी मॅडम (तालुका कृषि अधिकारी, श्रीगोंदा) त्यांच्या हस्ते बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आले.

Name Address Contact No Email ID
श्रीगोंदा
ओम चैतन्य कॉम्प्लेक्स,तहसील कचेरी समोर,श्रीगोंदा,जि.अ.नगर.
02487- 221010, 9130080840
vrudeshwarshrigondabranch@gmail.com
दौंड
ईश्वरी हेरीटेज बिल्डींग,राजधानी हॉटेल समोर,दौंड-पाटस रोड,दौंड,जि.पुणे.
02117-264444
vrudeshwardaundbranch@gmail.com
केडगाव स्टेशन
बाजार मैदान,मेमाणे कॉम्प्लेक्स,ता.दौंड,जि-पुणे.
02119-224000
vrudeshwarkdgbranch@gmail.com
पंढरपूर
मंगळवेढेकर कॉम्प्लेक्स,स्टेशन रोड,पंढरपूर,जि.सोलापूर.
02186-222801
vrudeshwarpandharpurbranch@gmail.com
पुणे
1169,सदाशिव पेठ, टिळक रोड,पुणे.
9175199539
vrudeshwarpune@gmail.com
पारगाव सुद्रिक
पारगाव सुद्रिक,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर.
9307938267
vrudeshwarpargaonbranch@gmail.com
आळंदी
189,घुंडरे गल्ली,मनकर्णिका चौक,आळंदी(देवाची),ता.खेड,जि.पुणे.
02135-233535
vrudeshwaralandi@gmail.com
बारामती
पहिला मजला,भारत व्हिजन बिल्डींग,महालक्ष्मी नगर,भिगवण रोड,बारामती,जि.पुणे.
02112-228023
vrudeshwarbaramati@gmail.com
पारगाव फाटा
नगर-दौंड रोड,पारगाव फाटा,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर.
9657611182
vrudeshwarpargaonfhatabranch@gmail.com
जामखेड
पंचायत समिती समोर,नगर-जामखेड रोड,जामखेड.
02421-299035
vrudeshwarjamkhed@gmail.com